स्व. मिश्रीलाल भिकचंद. छाजेड विद्यालयात 'अत्याधुनिक संगणक लॅब'चे थाटात उद्घाटन

Bay- team aavaj marathi 

नांदगांव येथील ना. शि. प्र. मंडळ संचलित स्व. मि. भि. छाजेड विद्यालयात नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक संगणक लॅबचा उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संकुल प्रमुख श्री. संजीव धामणे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ना. शि. प्र. मंडळाचे सचिव श्री. अश्विनी कुमार येवला सर यांच्या हस्ते लॅब चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. येवला सर म्हणाले की, "आजच्या डिजिटल युगात संगणकीय साक्षरता ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे, हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे."

या प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष श्री. विजय अण्णा परदेशी सर यांची देखील सन्माननीय उपस्थिती होती. तसेच श्री. गुलाब पाटील सर, अधीक्षक श्री.भैय्यासाहेब चव्हाण सर आणि श्री. गजानन होडे सर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता जाधव मॅडम यांनी केले. त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत नूतनीकरण केलेल्या लॅब बाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात जेष्ठ पत्रकार श्री. संजीव जी धामणे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. श्रीपाद मुळे यांनी केले. मान्यवरांचा परिचय श्री. दिपक नारळे यांनी करून दिला, तर कार्यक्रमाच्या शेवटी श्री. कैलास एकलारे यांनी सर्वांचे आभार मानले. या सोहळ्याला विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतनीकरण केलेल्या या सुसज्ज लॅब मुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments