Team-- aavaj marathi
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे, बुधवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ग्रामपालिकेच्या आवारात महिलांची ग्रामसभा घेण्यात आली, व पुरुषांची दि.१ फेब्रुवारी रोजी स्वतंत्र घेण्यात आल्या येथे प्रथमच महिला मोठ्या संख्येने ग्रामसभेसाठी उपस्थित होत्या. पहिल्यांदाच महिलांनी ग्रामसभेत सहभाग घेतल्यामुळे गावातील विविध समस्यांवर महिलांनी चर्चा केली,
याप्रसंगी महिलांनी गावातील अवैध दारू विक्री बंद करणे, येथील ग्रामपालीका मालकीची जुनी माध्यमिक शाळा असलेली व सध्या बखळ जागा श्री दत्त मंदिरासाठी देण्यात यावी, महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधने, म.बस्वेश्वर चौकात पेव्हर ब्लॉक बसविणे, गावात ठिकठिकाणी झालेल्या सांडपाण्याच्या बंदिस्त गटारी करण्यात आलेल्या असून उर्वरित ठिकाणी बंदिस्त गटारी करण्यात याव्यात, या व इतर समस्या उपस्थित महिलांनी मांडल्या.
तसेच दि १ फेब्रुवारी रोजी स्वतंत्र पुरुषांच्या झालेल्या ग्रामसभेत येथील प्राथमिक शाळेजवळील व शिवकालीन पुरातन दगडी वेश, गाव तळ्याच्या जागेवरील व इतर सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमण काढणे, अवैध व्यवसाय बंद करणे, मांस मच्छी मार्केट गावच्या बाहेर स्वतंत्र करणे, भारत निर्माण योजनेंतर्गत खोदलेल्या विहीरीची खोली वाढवून तेथील पाणी पुरवठा योजनेच्या टाकीमध्ये टाकणे, गाव तळ्याच्या जागेवर सामाजिक सभागृह व सार्वजनिक स्वच्छता गृह करणे, जिल्हा परिषद सेस फंडातून ब्राह्मण गल्लीत पीव्हीसी पाईप टाकून करण्यात आलेली सांडपाण्याची गटारीचे पाईप काही दिवसांतच फुटल्याने त्याची भरपाई ठेकेदाराकडून वसूल करणे व निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारास विकास कामे देऊ नये, येथील आरोग्य उपकेंद्रात कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहत नाही त्यांना नोटीस देणे, आ.ऊ. केंद्राची भिंत पाडणार्या ठेकेदाराकडून भरपाई करून घेणे, पालखी मार्ग सुशोभीकरण करुन पेव्हर ब्लॉक बसविणे, बौद्ध विहारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जागा देणे, गावाजवळ झालेल्या नवीन फ्लोटिंगची रिकामी जागा (ओपन स्पेस) ग्रामपंचायत नावावर करणे, बोरसे वस्ती येथे पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल करणे, त्याचप्रमाणे गावठाण जवळील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी गावातील डुकरांचा सुळसुळाट झाला असून बंदोबस्त करणे, दलीत वस्ती योजना राबविण्यात यावी इत्यादी विषयांवर सखोल व सकारात्मक चर्चा करून मान्यता देण्यात आली.
0 Comments