जातेगाव येथे रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 Team --aavaj marathi 

K.k.महाले यांचे कडून 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे प्रथमच बुधवार दि.७ फेब्रुवारी रोजी माता रमाबाई भिमराव आंबेडकर यांची १२६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, सालाबाद प्रमाणे यंदाही डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.


सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बौद्ध उपासक व उपासिका आणि ग्रामपालिकेचे पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सायंकाळी पाच वाजता डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून डिजे वाद्यावर भिमगिते लावून राजवाडा, पाटील गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, म.फुले चौक या मार्गाने संथगतीने मिरवणुक काढण्यात आली,यावेळी ठिकठिकाणी महिलांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे औक्षण केले.

डॉ. आंबेडकर चौकात आल्यानंतर बौद्ध वंदना घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपालिका सदस्य संदीप पवार यांनी केले.याप्रसंगी बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपालिका सदस्य बाळासाहेब लाठे,आप्पा त्रिभुवन कडूबा महाले, शंकर लाठे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सव समिती अध्यक्ष भीमराव निकम, राहुल महाले, राजू शेख, भय्या महाले, सोनू शिंदे, समाधान लाठे, राहुल लाठे, कडू त्रिभुवन, कीर्ती अर्जुन सोळस, अतुल सोनवणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरुण मित्र मंडळाने व महिला मंडळाने परिश्रम घेतले होते. 





Post a Comment

0 Comments