भगवान श्री विश्वकर्मा जयंती निमित्त सभा मंडपाची भूमिपूजन करण्यात

Team aavaj marathi 

न्यायडोंगरी येथे आज भगवान प्रभू श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंतीचे औचित्य साधून आ. सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून न्यायडोंगरी येथे सभा मंडप मंजूर करण्यात आला.

 विश्वकर्मीय सुतार लोहार समाज बांधवांनी केलेल्या विनंतीला मान देत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तात्काळ सभामंडप मंजूर करत, आज गुरुवार दि.२२ रोजी जयंतीचे औचित्य साधून भगवान श्री विश्वकर्मा सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन विलास भाऊ आहेर किरण अण्णा कांदे विश्वकर्मीय वंशीय सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री सुभाष लोहार यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी विश्वकर्मीय सुतार लोहार समाज बांधवांनी आलेल्या पाहुण्यांचा पुष्पहार देत सत्कार केला, यावेळी बोलताना श्री सुभाष लोहार यांनी समस्त सुतार लोहार समाज तर्फे आ. सुहास अण्णा कांदे यांचे आभार मानले.

 याप्रसंगी माजी सरपंच नरेंद्र आहेर संजय दिनकर आहेर विजुभाऊ आहेर धनंजय आहेर गणेश आहेर दादा आहेर राजाभाऊ तळवणे अनिल तुळशीराम आहेर तसेच युवासेना तालुकाप्रमुख सागर भाऊ हिरे भाऊराव बागुल प्रकाश शिंदे बाजार समितीचे संचालक दीपक मोरे शशिकांत सोनवणे रमेश काकळीज आण्णा मुंडे उमेश मोरे बापू जाधव, नंदु जयतमल, रामेश्वर सोनावणे, मछीन्द्र बागुल, ईश्वर जाधव, शांताराम जाधव,  दादा जाधव, विनोद सोनावणे, गणेश जाधव आदींसह ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सोनाली आढाव यांनी केले. तसेच जालम आहेर व शैलेश मिस्त्री यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments