शिवसेनेचे जेष्ठ नेते मा.मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घेतला अखेरचा श्वास

 Bay--team aavaj marathi 



शिवसेनेचे जेष्ठ नेते राज्याचे मा.मुख्यमंत्री मनोहर पंत जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दि.२१ रोजी हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्यांच्यावर उपचार सुरू असताना दि.२३ फेब्रुवारी२०२४ रोजी पहाटे ३.०२ मिनिटांनी त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. 



 स्व. मनोहर जोशी यांनी सन २०२३ मध्ये मे महिन्यात प्रकृती खालावली होती, त्यावेळी त्यांनी जिद्दीने मात केली होती. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव देह माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W५४ या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. 

जोशी सरांनी शिवसेनेच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री लोकसभा अध्यक्ष मुंबई महापालिका महापौर इत्यादी महत्वाच्या पदावर काम केले होते. ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे, त्यांच्यावर दादर येथील स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार होतील.




Post a Comment

0 Comments