बोगस आधार कार्ड आणि युडिआयडी कार्डाचा वापर करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Bay--team aavaj marathi 

 दिव्यांगांचे बोगस ओळख पत्र आणि आधार कार्डावर जन्म तारीखेत छेडछाड करुन एक चतुर्थांश आणि एक द्वितीय अंश प्रवास भाडे सवलत मिळवून देण्यासाठी राज्यात दलालांचे मोठे रॅकेट सक्रिय झाले असल्याची चर्चा सुरू असल्याचे दबक्या आवाजात ऐकू येत आहे.



 या दिव्यांगांचे ओळखपत्र आणि प्रमाणपत्राच्या माध्यमातुन त्यांना विवध सेवा सुविधांचा लाभ देण्यात येतो त्यात विशेषता प्रवासासाठी ग्राह्य धरण्यात येते परंतु यावरच छेडछाड करुन बोगस आधार कार्ड आणि युडिआयडी कार्ड तयार करून बस प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतांना दिसत आहे. 

असे बोगस आधार कार्ड आणि युडिआयडी कार्ड तयार करून देणारांचा बंदोबस्त करणे गरजेचे असून परिवहन विभागाचा विशेषता जनतेच्या पैशाची होत असलेली लुट थांबविण्यासाठी शासनाने योग्य निर्णय लवकरात लवकर घेणे आवश्यक आहे 

राज्य सरकारने जेष्ठ नागरिकांना प्रवास करण्यासाठी ५०% भाडे हि सवलत जाहीर केल्यानंतर अनेक नागरिक ज्यांचे वय प्रत्यक्षात साठ पेक्षा कमी आहे त्यांनी देखील आपल्या आधार कार्डावर जन्म तारीख इडिट करुन त्यात सन १९५९ सालातील अंदाजे जन्म तारीख दाखवून जेष्ठ नागरिक प्रवास सुविधा घेत आहेत.

हे करण्याकरिता काही महाभाग दलाल याचे रॅकेट सक्रिय आहे हजारो रुपये ऊकळत या बोगस अपंग दाखवुन  व  जेष्ठ नागरिक असल्याचे आधार कार्ड तयार करून देवून आपली तुंबडीभरत असल्याचे दिसुन आले आहे.

बस प्रवासादरम्यान वाहकाकडे सवलती च्या दराचे प्रवास टिकीट देण्यासाठी असे कार्ड ओळख पत्र तपासणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही, त्यासाठी प्रत्येक वाहकांकडे बोगस आधार कार्ड आणि युडिआयडी तपासणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नसल्याने बोगस आधार कार्ड आणि युडिआयडी कार्डच्या आधारे शासनाची अर्थात जनतेचे पैशाची असे महाभारत लूट करत असून त्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे, अशी मागणी जनतेतून होत आहे.


Post a Comment

0 Comments