संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त जातेगांवी श्रीमद भागवत कथा सप्ताह सोहळ्याची काल्याचे किर्तनाने सांगता

 Bay -team aavaj marathi 

ईश्वर जाधव पत्रकार जातेगाव नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील संत सावता महाराज मंदिर प्रांगणात संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने भागवत कथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले याची सांगता रविवार दि.४ रोजी ह.भ.प. प्रल्हाद महाराज महालकर यांच्या काल्याच्या किर्तनाने महाप्रसादाचे वितरण करुन करण्यात आली.

जातेगाव येथे दि.२८ पासून संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भागवत कथा पारायण सप्ताहाला प्रारंभ झाला होता. यावेळी प्रल्हाद महाराज महालकर, रा.पैठण यांच्या ज्ञानामृताचा लाभ उपस्थित भाविकांनी घेतला. शनिवार दि.३ रोजी सायंकाळी ४ वाजता टाळ-मृदुंगाच्या गजरात भव्यदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्त संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. ह.भ.प. प्रल्हाद महाराजांनी, भगवान श्रीकृष्णाच्या विविध बाललीलांचे वर्णन करुन भगवत नामाचा महिमा विशद केला."गोकुळीच्या सुखा, अंतपार नाहीं लेखा, बाळकृष्ण नंदा घरीं, आनंदल्या नरनारी. या अभंगाचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, श्री कृष्णाच्या जीवन चरित्रातूनच अनेक आदर्श जीवनमूल्यांचे दर्शन घडून येते. 

तसेच सावता महाराज यांच्या जीवनातील कर्म व भक्तीच्या समन्वयातून भगवत प्राप्तीचे वर्णन विशद केले.तसेच सप्ताह सोहळ्यासाठी अमूल्य योगदान देणार्‍या गायक, वादक, सेवेकरी व अन्नदाते आदींचा सप्ताह सोहळा समितीकडून सन्मान करण्यात आला. यावेळी परिसरातील वारकरी भजनी मंडळ,आजी -माजी सैनिक तथा ग्रामस्थ भाविक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील वारकरी संप्रदायातील मंडळी व महात्मा फुले तरुण मित्र मंडळाने परिश्रम घेतले होते 


Post a Comment

0 Comments