जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने वन विभागात सहाशे वृक्षांचे वृक्षारोपण

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरात नांदगाव आणि येवला येथील जय बाबाजी भक्त परिवाराने जगद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी श्री शांतिगिरिजी महाराज यांच्या आदेशान्वये महंत महादेव गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उंबर, वड, पिंपळ, लिंब, बेल, करंज,आवळा आशा विविध प्रजातीचे सुमारे सहाशे वृक्षांची श्रमदानातून वृक्षारोपण केली.
वृक्षारोपण करताना भक्त परिवारातील महिला मंडळ व सेवक सोबत वनरक्षक 

यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराचे तालुका सेवक हरेश्र्वर सुर्वे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा पिनाकेश्वर मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अर्जुन पाटील, कोषाध्यक्ष रामदास पाटील, सचिव बाबासाहेब चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे, वनरक्षक नवनाथ बिन्नर, अमोल पवार, आण्णा टेकनर, कृष्णा शेटे, हरिभाऊ क्षिरसागर, नवनाथ ढेरांगे, सुभाष चव्हाण, शिवाजी आण्णा, भगिनात गायके, राजू नलावडे, तसेच मोठ्या संख्येने महिला भक्त मंडळी उपस्थित होते. 
वृक्षारोपण करताना वन रक्षक नवनाथ बिन्नर आणि देवस्थान ट्रस्टचे रामदास पाटील 
याप्रसंगी भक्त परिवाराच्या वतीने हरेश्र्वर सुर्वे म्हणाले की, येत्या काही दिवसांत या परिसरात मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यात येणार असून, भक्त परिवारातील सदस्य तसेच नागरिकांना स्व इच्छेने श्रमदान करण्याची तयारी असेल त्यांनी वृक्ष लागवड करण्यासाठी यावे असे आवाहन केले.






Post a Comment

0 Comments