Bay- team aavaj marathi
शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
आषाढ पौर्णिमेचे औचित्य साधून येथील सुमेध बोधी बुद्ध विहारामध्ये श्रीरंग सोमाजी कांबळे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या ' बुद्ध आणि त्यांचा धम्म ' हे डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाच्या वाचनाने वर्षावास प्रर्वाला उत्साह सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात सुमेध बोधी विहार समितीचे माजी अध्यक्ष प्रा डॉ. अनिल काळबांडे यांनी 'वर्षावासाचे महत्त्व आणि बौद्ध धम्म स्त्रियांचे योगदान' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.प्रारंभी सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने उपस्थितांना त्रिशरण सह पंचशील प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष प्रतिभाताई विजयराव खडसे त्याच बरोबर शकुंतला जयभीम लोणे,गयाबाई सुभाष वाठोरे, प्रतिभा भीमराव सोनुले, अनिता पाटील,रेखा संजय गोवंदे, संगीता सुभाष बरडे, शशिकला पांडुरंग काळबांडे ,ज्योती सखाराम वाठोरे, विद्या अतुल पाईकराव,रत्नमाला भीमराव रोकडे, सुनीता विलास वाळके , शांताबाई उत्तम पडघने, बौध्दाचार्य गंगाधर खंदारे यांच्यासह महिला मंडळाची उपस्थिती होती.
यावेळी बुद्धाने त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन करताना श्रीरंग कांबळे यांनी सिद्धार्थाचा जन्म तर सिद्धार्थच्या वैवाहिक आयुष्य या धर्म ज्ञान घडणाऱ्या घटनांचा आढावा घेत सिद्धार्थ ची बालपणापासूनच असलेली मानवी कल्याणाची भूमिका विशद केली तर डॉ. काळबांडे यांनी बौद्ध धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म असून या धम्माच्या आचरणाने मनुष्य दुःख मुक्तीच्या मार्गाकडे जाऊन आपले जीवन सुखमय रित्या जगू शकते त्यामुळे धम्माचे आचरण महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. जवळपास ३ महिने वर्षावास निमित्याने ग्रंथाचे पठण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास असंख्य महिला उपस्थित होत्या.
0 Comments