तिसर्या श्रावणी सोमवार निमित्त सुमारे अडीच लाखांपेक्षा अधिक भाविकांनी घेतले पिनाकेश्वराचे दर्शन

 Bay-- team aavaj marathi 

सालाबादप्रमाणे यंदाही नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिवलिंग आणि नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून सात किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर असलेले श्रीक्षेत्र पिनाकेश्वर महादेव मंदिर येथे श्रावण महिन्यातील पवित्र तिसऱ्या सोमवारी च्या निमित्ताने रविवारी रात्री १२ वाजेपासून सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत सुमारे अडीच ते पावणेतीन लाख भाविकांनी दर्शन घेतले.

 जगद्गुरु शांतिगिरी जी महाराज पिनाकेश्वरास अभिषेक बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇

 https://youtu.be/PbfeVJxvHqM?feature=shared

दर्शनर्थी भाविकांची अलोट गर्दी झाल्याने प्रसाद मिठाई इमिटेशन ज्वेलरी त्याचप्रमाणे इतर व्यवसायिकांचे व्यवसाय चांगले झाल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल झाली. देवस्थान ट्रस्टच्या आणि संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज उत्तराधिकारी जगद्गुरु शांतिगीरी जी महाराज यांनी देवास महाभिषेक केला.
देवाला अभिषेक करताना जगद्गुरु श्री शांतिगिरी जी महाराज 

 त्यानंतर बेल आणि भोपळ्याच्या फळांमध्ये अंदाजे ७० हजार पेक्षा अधिक पुरुष तसेच महिला भाविकांनी श्री गजानन महाराजांचे शेगांव येथून तसेच वैजापूर तालुक्यातील सरला बेट, श्रीक्षेत्र वेरूळ कोपरगाव येथून पवित्र नदी पात्रातील जल घेऊन सुमारे ६० ते २५० किलोमीटर आंतर पायी अनवाणी पायाने चालत येऊन रविवारी रात्री १२ वाजेनंतर हर हर महादेव, सद्गुगुरू जनार्दन स्वामी महाराज की जय, गंगामैय्या की जय, गंगागिरीजी महाराज की जय, बंम बंम भोले च्या गजराने मंदिर परिसर आणि संपूर्ण ३ किलोमीटर परिसर दुमदुमून गेला होता.पिनाकेश्वरास जलाभिषेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये यावर्षी महिलांची संख्या दोन हजार असल्याचे व्यवस्थापन समितीने सांगितले.
दर्शन करताना भाविक 

देवाला जलाभिषेक करण्यासाठी आलेले भाविक 

यावर्षी पाऊस नसल्याने अनवाणी पायाने पवित्र जल आणनार्या भाविकांच्या पायास मोठ्या प्रमाणात इजा झाल्या होत्या. त्यांच्यावर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दत्तात्रय मोरे डॉ महेश देशमुख, फिरोज मन्सूरी, प्रकाश चव्हाण,राम काळे साहेबराव काटकर शकील शेख आणि वैद्यकीय पथक तसेच खाजगी डॉ.प्रदिप चौधरी, अमोल उगले, अलोक बिस्वास यांनी उपचार केले.
दर्शनासाठी आलेले भाविक 

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक 

 रात्रभर सुरू असलेला जलाभिषेक सोमवारी सायंकाळ पर्यंत सुरू होता. त्यासोबत दिवसभर अबालवृद्धांसह महिला आणि भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आलेल्या भाविकांनी वनपर्यटन आणि वनभोजना मनमुराद आनंद लुटला. मराठवाडा तसेच बाहेर गावच्या जलाभिषेक करण्यासाठी येणार्या भाविकांनी आणि दर्शनार्थी भाविकांनी परतीच्या प्रवासासाठी स्वतःची वाहनांची व्यवस्था केलेली असल्याने डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल, रिक्षा, कार, टेंपो, पिकप, छोटाहात्ती इत्यादी वाहनांची रविवारी सकाळ पासून सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी झाली होती. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन (बंडू) पाटील उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार,सचिव बाबासाहेब चव्हाण, कोषाध्यक्ष रामदास चव्हाण, विश्वस्त शरद पवार, शिवाजी वर्पे, ज्ञानदेव चव्हाण व शिवाजी गायकवाड, गणेश गवंडर, अनिल शिंदे कैलास तुपे, श्री पिनाकेश्वर तरूण मित्र मंडळ, आणि सामाजिक कार्यकर्ते पस्थितीवर लक्ष ठेवून होते.रविवारी दिवस रात्र व सोमवारी सायंकाळपर्यंत स्वयंसेवकांनी येनार्या भाविकांना योग्य मार्गदर्शन केले.
यात्रेतील गर्दी 

या वर्षी देखील जातेगांव ग्रामस्थांच्या वतीने आणि नांदगाव चे माजी नगराध्यक्ष राजेश (बबिकाका) कवडे यांच्या जनसेवा मित्र मंडळ, संजय नगर मित्र मंडळ छत्रपती संभाजी नगर यांच्या वतीने आणि व्यक्तिगत, मित्र मंडळांनी येथे येनार्या भाविकांसाठी मोफत चहा पाणी आणि शाबुदाना खिचडीचे (भंडार्याचे) आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती संभाजी नगर येथील खासगी सुरक्षा रक्षक आणि पोलिस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, सुनील बढे आणि गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भास्कर बस्ते, भरत कांदळकर, पोलिस शिपाई परमेश्वर श्रीखंडे तसेच पुरुष व महिला पोलिस शिपाई, दंगारोधक पथक आणि होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त बजाविल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

Post a Comment

0 Comments