Bay- team aavaj marathi
शरद आहेर सर पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात पत्रकार दिनानिमित्त दि ८ जानेवारी शुक्रवार रोजी पत्रकार सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक, इंजि.अमित भाऊ बोरसे -पाटील होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला माता सरस्वती व मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचावर इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील, विजय काकळीज, प्रभाकर कवडे यांच्यासह पत्रकार बांधव - संजीव निकम, सुरेश शेळके, सुरेश नारायणे, महेंद्र पगार, राजेंद्र तळेकर, बाबासाहेब बोरसे, बाबासाहेब कदम,प्रमित आहेर, अरुण हिंगमिरे,सचिन बैरागी, किरण काळे, मारुती जगधने, सिताराम पिंगळे, महेश पेवाल, सुहास पुणतांबेकर, राजेंद्र जाधव, चंद्रकांत भालेराव, भगवान हिरे, विजय बडोदे, बापू जाधव, नानाभाऊ अहिरे, अनिल धामणे, किरण भालेकर, विजय भावसार आदी पत्रकार उपस्थित होते, यां सर्वांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगत इंजि. अमित भाऊ बोरसे -पाटील यांनी पत्रकारांबद्दल गौरव उद्गार उच्चारताना, स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारांचे कार्य गौरवास्पद आहे. सुदृढ लोकशाही राष्ट्र घडविण्यासाठी वृत्तपत्र हे सक्षम माध्यम असल्याचे उदगार काढले. वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य होत असते. पत्रकार बंधूंचे कार्य समाजासाठी महत्त्वाचे असते .हे देखील त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात संस्थेने सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत ' विद्यार्थी सुरक्षा- कल्याण निधी अंतर्गत युवराज खैरनार, ऋतुजा मदने, शुभम खताळ या विद्यार्थ्यांना इंजि.अमित भाऊ बोरसे- पाटील यांचा हस्ते धनादेश देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार संजीव निकम यांनी खरं तर ,पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही, तर ते एक व्रत आहे. पत्रकारितेत येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी अभ्यासू आणि निर्भय असावे हे सांगितले. पत्रकार सुरेश नारायणे यांनी मनोगतातून विद्यालयाचे ऋण निर्देश केले. उपशिक्षक दत्तात्रय भिलोरे यांनी आपल्या मनोगतातून पत्रकार बंधूंचा कार्याचे विश्लेषण केले. विजय काकळीज यांनी आपल्या मनोगत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले . संगीत साथ संगीत शिक्षिका कल्पना अहिरे यांनी दिली. कार्यक्रमात उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे, प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे, मुख्याध्यापक अविनाश साळूंके उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख शरद आहेर तर आभार ज्ञानेश्वर पगार मानले.
फोटो ओळ - मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात पत्रकार सन्मान सोहळा निमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करताना संचालक इंजि अमित भाऊ बोरसे -पाटील, संजीव निकम, सुरेश नारायणे, विजय काकळीज, ज्योती काळे, अरुण हिंगमिरे,प्रमित आहेर, नाना अहिरे, चंद्रकांत भालेराव व सर्व उपस्थित मान्यवर.




0 Comments