अज्ञात वाहनाच्या धडकेत किर्तीकांत कुलकर्णी यांचा मृत्यू

Bay- team aavaj marathi 

मुक्ताराम बागुल पत्रकार रोहिला नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील रोहिले येथील रहिवासी किर्तीकांत रामचंद्र कुलकर्णी वय ४५ रा यांचा शनिवार दि १७ रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.

या बाबत सविस्तर वृत्त असे की किर्तीकांत रामचंद्र कुलकर्णी हे आपल्या मोटारसायकल वरून वैजापूर तालुक्यातील गारज येथून देवगाव च्या दिशेने जात असताना त्यांना गारज ते झोलेगाव या दरम्यान नवीन बांधकाम करण्यात आलेल्या टोलनाक्यावर पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने किर्तीकांत कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई पत्नी तीन मुली भाऊ असा परिवार आहे.

वरील घटनेची माहिती मिळताच गारज पोलिस औटपोस्त च्या-पोलिस नाईक सविता वर्पे यांनी घटनास्थळी धाव घेऊन किर्तीकांत कुलकर्णी यांना शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याने त्यांचे शवविच्छेदन करून अंत्यविधी साठी नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

वरील घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक शिऊर पोलिस ठाण्याचे वैभव रनखाम मार्गदर्शनाखाली गारज पोलिस औटपोस्त च्या-पोलिस नाईक सविता वर्पे , पो.कॉ. मुच्छींद्र राउत हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments