जय बाबाजी स्कूलमध्ये सेंद्रिय शेती उपक्रम विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शेतीचे धडे

Bay- team aavaj marathi 

एकनाथ भालेराव पत्रकार येवला (नाशिक)

येवला तालुक्यातील नगरसूल येथील जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सेंद्रिय शेतीचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी आहाराची सवय तसेच श्रम प्रतिष्ठेची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळेच्या परिसरात कोणत्याही रासायनिक खते व कीटकनाशकाचा वापर न करता पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. 

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे पेरणी, सेंद्रिय खतांची निर्मिती, पाणी व्यवस्थापन तसेच पिकांची निगा राखणे याबाबत प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. शाळेत पिकवलेली ताजी सेंद्रिय भाजी विद्यार्थ्यांना घरी देण्यात येत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही सेंद्रिय शेती व आरोग्यदायी भाजीपाला व अन्न या बाबत सकारात्मक जागृती निर्माण झाली आहे.

शाळेने राबविलेला हा सेंद्रिय शेती उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरत असून परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

रासायनिक कीटकनाशके व पर्यावरणीय दुष्परिणाम – 

अतिरिक्त उत्पादनाच्या हव्यासापोटी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जात आहे. मात्र यामुळे मातीची सुपीकता कमी होत असून पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. कीटकनाशकांचे अंश अन्नसाखळीत मिसळल्याने मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कर्करोग, त्वचारोग व श्वसनविकार या सारख्या आजारांचा धोका वाढत आहे.तसेच उपयुक्त कीटक, पक्षी व जैवविविधतेवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. 

त्यामुळे भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज असून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळणे आवश्यक आहे.... 

 रामकृष्ण जाधव संस्थापक अध्यक्ष जय बाबाजी इंग्लिश मीडियम स्कूल नगरसूल

Post a Comment

0 Comments