पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाच्या पिल्लावर कुत्र्यांचा हल्ला हरण गंभीर जखमी

 Bay- team aavaj marathi 

 नांदगाव तालुक्यातील ढेकू तांडा वाकला रस्त्याच्या बाजूला असलेल्या खंगाळ्याच्या तलावाजवळ पिण्याच्या पाण्याच्या शोधात आलेल्या साधारण दोन ते अडीच महिन्यांच्या मादी जातीच्या हरणाच्या पिल्लावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले हरणाचे पिल्लू 

सविस्तर वृत्त असे की ढेकू तांडा वाकला रस्त्याच्या बाजूला असलेल्या खंगाळ्याच्या तलावाजवळ दि १५ रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान पिण्याच्या पाण्याच्या शोधात आलेल्या साधारण दोन ते अडीच महिन्यांच्या मादी जातीच्या हरणाच्या पिल्लावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तीच्या मागील उजव्या पायाच्या मांडला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. 

दरम्यान खंगाळ्याच्या तलावाजवळच येथील उपसरपंच राजेंद्र चव्हाण आणि कैलास छगन राठोड हे आपल्या शेतात काम करत असताना भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पिल्लावर हल्ला चढवला असल्याचे बघितल्या बरोबर त्यांनी पळतं जावून कुत्र्यांना हाकलून दिले.व हरणाच्या पिल्लाची सुटका करून वनरक्षक नवनाथ बिन्नर यांना माहिती कळवली असता त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत कोकाटे व वनपाल डी एफ वडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगारी वनमजूर विष्णू जाधव, नितीन जाधव,अजय जाधव, वाल्मीक चव्हाण यांनी उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांची भेट घेऊन हरणाच्या पिल्लाला ताब्यात घेतले व त्याच्यावर प्रथमोपचार करून सायंकाळी उशिरा नैसर्गिक अधिवासात सोडून दिले असल्याचे वनरक्षक एन एम बिन्नर यांनी सांगितले .



Post a Comment

0 Comments