उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार दि.२३ जानेवारी पासून राज्य सरकारच्या वतीने स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त एसटी संगे तीर्थाटन' योजना म्हणजे श्रद्धा, सुविधा आणि सामाजिक न्याय यांचा सुरेख संगम आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ही योजना सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशा दरात सुरक्षित प्रवासाची हमी असणारी धार्मिक पर्यटनाची अनुभूती देण्याचा तिचा मुख्य उद्देश आहे,असे ते म्हणाले.
२३ जानेवारी पासून ही योजना राज्यातील २५१ आगारात एकाच वेळी राबविण्यात सुरुवात करण्यात आली असून प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येक आगारातून किमान ५ बसेस या योजनेसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने, राज्यभरात एका दिवशी सुमारे १,००० ते १,२५० धार्मिक व पर्यटन विशेष बसगाड्या धावणार आहेत. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला एक नवे बळ मिळणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, ११ मारुती दर्शन, पंढरपूर-अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर-पन्हाळा-जोतिबा, गणपतीपुळे, शेगाव, शिर्डी अशा विविध श्रद्धास्थळांच्या सहली आयोजित केल्या जाणार आहेत.
वरील योजना राज्यातील लाखो भाविकांसाठी श्रद्धेचा, सुरक्षिततेचा आणि समाधानाचा प्रवास ठरणार आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे परिवहन मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी कळविले आहे. याबाबत अधिक माहिती देताना ग्रामीण भागातील ४० प्रवाशी त्यात महिला असतील तर महिला यांना नियमा प्रमाणे ५०% टक्के, ६५ वर्ष नागरिक यांना ५०% टक्के सवलत तसेच ७५ वर्ष पुढील अमृत जेष्ठ नागरिक यांना १०० % टक्के आणि दिव्यांग प्रवाशांना देखील नियमा नुसार सवलत मिळणार आहे. असे नांदगाव परिवहन आकाराचे प्रमुख हेमंत पगार यांनी सांगितले.
0 Comments