जातेगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी गुन्हा दाखल

Bay- team aavaj marathi 

दि. ७ 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे शुक्रवारी दि ६ रोजी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश कपाटातून करुन ११ ग्रॅम सोन्याचे मनी मंगळसूत्र असलेली पोत चोरुन नेल्याची घटना घडली आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील रहिवासी असलेले व पुणे पोलिस दलात कार्यरत असलेले नारायण हरीभाऊ पेहेरकर आणि इतर चार जनांच्या बंद घरांचे कुलूप तोडून चोरी करण्यात आल्या असून त्यांनी गुन्हा दाखल केला नसून पेहेरकर यांनी गुन्हा दाखल केलेल्या तक्रारीनुसार यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजाचा लॉक तोडून कपाटातून ११ ग्रॅम सोन्याचे मनी मंगळसूत्र असलेली पोत चोरुन नेल्याची घटना घडली आहे. चोरी गेलेली पोत ही साधारण पंधरा वर्षांपूर्वी २४ हजार रुपयांमध्ये केलेली असून त्याची आज रोजी बाजार मुल्य १ लाख ७० हजार रुपये आहे. 

परंतु घरमालक नारायण पेहेरकर हे पुणे पोलिस दलात कार्यरत जिल्हा परिषद व पंचायत समिती बंदोबस्तात व्यस्त असल्याने ते स्वतः तक्रार दाखल करण्यासाठी उपस्थित नसल्याने त्यांचा पुतण्या किशोर निवृत्ती पेहेरकर वय ३० रा जातेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर ४३/२०२६ नुसार बी एन एस कायदा ३३१(४)३०५ प्रमाणे दि. ७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला करुन dog squad (डॉगस्कॉड) आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आले होते.

 परंतु कुठलाही सुगावा लागला नाही. वरील गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भास्कर बस्ते हे तपास करत आहेत. 

Post a Comment

0 Comments