त्याग मूर्ती माता रमाई यांच्या जयंती उत्सवा निमित्त अन्नदान व इंजि. दावंडे यांचा प्रबोधन कार्यक्रम उत्साहात

Bay- team aavaj marathi 

प्रज्ञानंद बापू जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव शहरातील समाजिक क्षेत्रातील अग्रेसर असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महावीर (नाना)जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे नांदगाव शहरात त्याग मूर्ती माता रमाई यांची जयंती अतिशय उत्सवात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सांस्कृतिक माध्यमातून सत्यपाल महाराजांचे शिष्य,यांचे तुफान विनोदी प्रबोधनकार प्रसिद्ध इंजि.पवन महाराज दावंडे यांच्या कार्यक्रमाचे व अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी त्यागमुर्ती माता रमाई जयंती उत्सवाची सुरवात सर्व प्रथम समृद्धी बँकेच्या अध्यक्षा समाजसेविका सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या आणि महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे, उपनगराध्यक्ष राजेश शिंदे यांच्या सह सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी देखील पुष्प अर्पण करून वदंन केले. 

यावेळी सौ अंजुमताई कांदे यांनी उपस्थित सर्व बहुजन जनसमुदाय यांना काबाड, कष्ट,त्याग,संघर्ष,मातृत्व,प्रेम, यावर रमाईच्या,जिजाऊंच्या, सावित्रीबाई,अहिल्यादेवी, संस्काराचे आठवण करून दिली प्रत्येक महिला ही माते समान बहिणी प्रमाणे असते,आपले संस्कार आपल्याला घडवतात या थोर मातांच्या आठवणींना उजाळा देत, मालेगावातील घटनेच्या आठवणीने तीन वर्षाच्या चिमुकलीच्या आईने माझा हात हातात घेतला. आणि एकच आक्रोश करत हंबरडा फोडला होता. त्या आठवणीने अंगाला काटा येतो. अशा घटना घडु नये यासाठी समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

यावेळी प्रबोधनकार इंजि.दवंडे यांनी रस्त्याने जाण्याऱ्या महिलेला ताई आई बहिणी म्हणुन हाक मारायचे पहिले शिकवा संस्कार घडवा मुलांवर तेव्हाच आपला देश पुढे जाईल.छत्रपती शिवाजी महाराजांनी ३६५ किल्ले जिंकले पण लिंबू मिरची कधी बांधली नाही. अंधश्रद्धा बाहेर काढा आणि मानवतावादी विचार डोक्यात घ्या मी आणि माझ्या पत्नीने देहदान केला. समाजासाठी आपले काही देणे लागते हे लक्षात ठेवा. स्पर्धेचे युग असुन टिकायचे असेल तर शिक्षण महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवा.

 या पुरोगामी महाराष्ट्रात विचार शुद्ध हवे तेव्हाच बुद्ध दिसतील संविधान बदलणाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले असे ऐकण्यात येते परंतु जो पर्यंत सुर्य चंद्र आहे तो पर्यंत बदलणे शक्य नाही २६ जानेवारी रोजी घटनेच्या जोरावर नाशिकला माधवी जाधव या भीमाच्या वाघीनीने डरकाळी फोडली कशाच्या जोरावर शिक्षणाच्या आणि संविधानाच्या आणि याचं घटनेने बहुजनांना बळकट देखील केले आहे. असे आपल्या विशेष शैलीतून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्त शहरातील ज.ता.का. खंडेलवाल जैन धर्म शाळा या प्रांगणात सायंकाळी माता रमाई यांच्या आठवणींना उजाळा देत पार पडला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य आनंद पवार यांनी केले. तर प्रस्तावना  उपनगराध्यक्ष/नगरसेवक नितीन जाधव यांनी केली. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार महावीर जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत गरुड, गौतम काकळीज,जफर शेख,किरण पवार,दीपक मोरे,सोहेल रंगरेज, पिंटू लोखंडे,ऋषी जाधव,शशी जाधव,सोमनाथ चौधरी, सलमान पठाण, चेतन इघे,संदीप इघे,संदीप महिरे, अर्जुन पैठणकर यांच्यासह अनेक मित्र परिवारांनी परिश्रम घेतले



Post a Comment

0 Comments