Bay- team aavaj marathi 

K.k.महाले पत्रकार जातेगाव नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आले होते.

यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर सायंकाळी ५ वाजता आयोजन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आले होते. यावेळी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांनी त्रिसरण पंचशील ग्रहण केले. यावेळी सुरू असलेल्या डिजेवाद्यावर भिमगितानी कार्यक्रमास रंगत भरली होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कचरू लाठे सर यांनी केले व सूत्रसंचालन कडूबा महाले यांनी केले, या कार्यक्रमास ग्रामपालिका सदस्य बाळासाहेब लाठे, संदीप पवार, रामदास चव्हाण, राजू शेख यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांना अन्नदान करुन करण्यात आली.

वरील सर्व कार्यक्रमाचे नियोजन माता रमाई उत्सव समिती पदाधिकारी आदित्य महाले, सोनू शिंदे, भीमराव निकम, राहुल लाठे, बाबासाहेब शिंदे, शेखर महाले, राहुल महाले, तातेराव लाठे यांच्यासह तरुण मित्र मंडळाने केले.