या गावात प्रथमच झाली महिलांची ग्रामसभा

 Team-- aavaj marathi


नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे, बुधवार दि.३१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ग्रामपालिकेच्या आवारात महिलांची ग्रामसभा घेण्यात आली, येथे प्रथमच महिलांची ग्रामसभा घेण्यात आल्याने महिला मोठ्या संख्येने ग्रामसभेसाठी उपस्थित होत्या. 


शासनाच्या निकषाप्रमाणे दिनांक २६ जानेवारी रोजी होणारी ग्रामसभा येथील ग्राम विकास अधिकारी सतीश शिंदे यांच्याकडे इतरही ग्रामपंचायतीचे कामकाज असल्याकारणाने दि.२६ रोजी तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा दिनांक ३१ जानेवारी रोजी ग्रामसभा घेण्यात आली.

याप्रसंगी महिलांनी गावातील अवैध दारू विक्री बंद करणे, येथील ग्रामपालीका मालकीची जुनी माध्यमिक शाळा असलेली व सध्या रिकामी असलेली बाळ जागा श्री दत्त मंदिरासाठी देण्यात यावी, महिलांसाठी सार्वजनिक शौचालय बांधने, म.बस्वेश्वर चौकात पेव्हर ब्लॉक बसविणे, गावात ठिकठिकाणी झालेल्या सांडपाण्याच्या बंदिस्त गटारी करण्यात आलेल्या असून उर्वरित ठिकाणी बंदिस्त गटारी करण्यात याव्यात या व इतर समस्या उपस्थित महिलांनी मांडल्या याप्रसंगी समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी साळुंखे यांनी महिलांच्या विविध आजारांच्या बाबतीत मार्गदर्शन केले व काही समस्या असतील तर प्राथमिक आरोग्य केंद्रात निःसंकोचपणे जावे तेथे, उपचार आणि योग्य मार्गदर्शन केले जाईल असे सांगितले.

प्रथम झालेल्या महिला ग्रामसभा बघण्यासाठी खालील लिंक ला टच करा



 तसेच हसिना शेख यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियानांतर्गत  महिलांना बचतगटाच्या माध्यमातून व्यवसाय करणे व इतर माहिती दिली.तर ग्रामविकास अधिकारी सतीश शिंदे यांनी केंद्र तसेच राज्य सरकार महिलांच्या बाबतीत राबवत असलेले महिलांचे ग्रामसभेतील अधिकार त्याचप्रमाणे गावच्या विकासासाठी सर्व महिलांनी एकत्रित येऊन दर तीन ते चार महिन्यातून एक वेळेला ग्रामसभा घेणेबाबत अर्ज देऊन आपल्या समस्या मांडाव्यात असे सांगितले. यावेळी सरपंच शांताबाई पवार, उपसरपंच पंढरीनाथ वर्पे, सदस्या सौ. कल्पना गायकवाड, सौ. शाबेराबानो शेख, सौ. कांताबाई खिरडकर, सौ.धनश्री पवार, सौ.अनिता निंबारे, सौ. वैशाली चव्हाण, सौ.मनिषा पगारे, सौ.ज्योती पगारे, आणि सौ. पुजा जाधव यांच्यासह रामदास पाटील, बाळासाहेब लाठे, संदिप पवार आणि सुरेश जाधव हे सदस्य ग्रामपालिकेचे सर्व कर्मचारी तसेच महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments