महंत शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढविणार दोन मतदारसंघात चाचपणी सुरू

 Bay--Team aavaj marathi 

महंत श्री श्री श्री महामंडलेश्वर १००८ स्वामी शांतिगिरी महाराज आगामी लोकसभा निवडणूकीत लोकसभा निवडणुक लढविणार असले बाबत गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यात चर्चा सुरू असून नाशिक मतदारसंघातून महंत शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्याची शक्यता आहे, त्यांनी उमेदवारी साठी होकार दर्शविला आहे.


 निवडणुकीत शांतिगिरीजी महाराजांना निवडून आणण्याचा निर्धार जय बाबाजी भक्त परिवाराने पत्रकार परिषदेत व्यक्त केला. नाशिकबरोबरच छत्रपती संभाजीनगर येथूनही महाराजांच्या उमेदवारी साठी चाचपणी केली जात आहे. 

जय बाबाजी भक्त परिवाराने महाराजांना निवडून आणण्याचा केला निर्धार 


आज झालेल्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत नाशिक लोकसभेच्या निवडणूक रिंगणात शांतिगिरीजी महाराजांना उतरविण्याचा निर्णयाबाबत माहिती भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी दिली आहे. मात्र महाराज कोणत्या राजकीय पक्षाच्या वतीने निवडणुक लढविणार आहे की,अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार हा विषय गुलदस्त्यात आहे.

Post a Comment

0 Comments