वादग्रस्त पोस्ट टाकल्यावरुन घाटमाथ्यावर सकल हिंदू समाज आक्रमक, बंद पाळून नोंदविला निषेध

 Team aavaj marathi

जातेगांव आणि बोलठाण येथील काहि समाजकंटकांनी मोबाईलवर हिंदु समाजाच्या भावना दुखतील अशा प्रकारचे स्टेटस ठेवल्यामुळे घाटमाथ्यावर बोलठाण आणि जातेगाव येथे हिंदु समाज बांधवांच्या अवहानाला प्रतिसाद देत सर्व आस्थापनांच्या संचालकांनी स्वयंस्फूर्तीने दिवसभर कडकडित बंद पाळून या घटनेचा निषेध केला.


हिं
दू समाज बांधवांचे भावना दुखवतील अशा तथाकतीत समाजपावना दुखवतील अशा तथाकतीत समाजकंटकांनी स्टेटस ठेवलेल्या आरोपींवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी आणि कठोर गुन्हे दाखल करावे यासाठी तालुक्यातील सर्व हिंदू संघटना आक्रमक झाल्याने, नांदगाव पोलीस स्टेशन येथे मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि उप विभागीय पोलिस अधिकारी साहिल शेख यांनी बुधवारी सकाळी तातडिने भेट दिली. व सकल हिंदू समाज बांधवांच्या भावना समजून घेतल्या यावेळी घाटमाथ्यावरील हिंदू समाज बांधवांनी त्यांना  निवेदन दिले असता अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी वरील घटनेतील सर्व आरोपींवर कायदेशीर कठोर कारवाही करण्यात येईल असे आश्वासित केले.

*काय म्हणाले अप्पर पोलीस अधीक्षक हे बघण्यासाठी खालील लिंक ला टच करा*


याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी  मोबाईलवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे घाटमाथ्यावर जातेगाव आणि बोलठाण येथे तणावाचे वातावरण निर्मान झाले होते या बाबत माहिती नांदगाव पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी सकल हिंदू समाज बांधवांच्या भावना समजून घेत तथाकथित समाजकंटकांवर गुन्हा दाखल करून काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. 


हिंदू समाजाच्या भावना बुद्धी पुरस्कार दुःखविणाऱ्या सर्व समाजकंटकांना अटक करुन सर्वांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने जातेगाव आणि बोलठाण येथे बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यास प्रतिसाद देत सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापना सायंकाळ पर्यंत बंद ठेवून निषेध नोंदविला. गोरगरीब नागरिकांना प्रापंचिक अडचणी निर्माण होऊ नयेयासाठी सायंकाळी पाच वाजता सर्व दुकाने उघडण्यात आले असून, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती आणि उपविभागीय पोलीस  अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज वाघमारे यांनी जातेगाव व बोलठाण येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवलेला असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.



आपल्या परिसरातील बातम्यांसाठी आवाज मराठी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचेे बटन दाबण्यास विसरू नका

 









Post a Comment

0 Comments