मनमाड आणि नांदगाव मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने मनमाड सार्वजनिक वाचनालय येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बळवंतराव आव्हाड हे होते
मनमाड सार्वजनिक वाचनालय येथे 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे अध्यक्ष बळवंतराव आव्हाड हर्षद गद्रे सचिन बैरागी महेंद्र पगार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करण्यात आले यानंतर दिवंगत पत्रकार कादिर शेख यांना सामूहिक श्रद्धांजलीनंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळेस हर्षद गद्रे सचिन बैरागी महेंद्र पगार आझाद आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले
का कार्यक्रमाचे अध्यक्ष बळवंत आव्हाड यांनी पत्रकारिता संघटन आणि संघटना यावर आपले मत मांडत असताना पत्रकारांना होणारा अन्याय हा मोडीत काढण्यासाठी सर्वांनी एकजुटीने जर उभे राहिले तर निश्चितच अन्याय करणाऱ्या कुठेतरी भाग बसेल आणि कोणीही विनाकारण अन्याय करण्याची हिम्मत करणार नाही असे मत व्यक्त करीत असताना पत्रकारितेच्या विविध असणाऱ्या घडामोडींवर त्यांनी आपलं मत व्यक्त केले
या प्रसंगी भरत पारखं, अमोल बनसोडे सतीश परदेशी या तिघांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन चा ठराव करून त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास हेमराज वाघ किरण काळे नाना विसपुते ईश्वर जाधव, राजेंद्र तळेकर विनोद वर्मा क्रांती आव्हाड अफरोज आतार , बाळू अहिरे, जगदीश आडसुळे कल्पेश बेदमुथा सागर भावसार
आदींचा सहभाग होता या कार्यक्रमाचे नियोजन मनमाड शहर पत्रकार संघाच्या वतीने आझाद आव्हाड अविनाश पारखे यांनी केले
0 Comments