पिनाकेश्वर देवस्थान ट्रस्टची सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा

 by AavajMarathi Team


 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शिवमंदिर असलेल्या नांदगाव तालुक्यातील जातेगांव पासून उत्तरेस चंदनपुरी शिवारातील सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर असलेल्या श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेव देवस्थान ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ७ रोजी १२ वाजता येथील सभागृहात संपन्न झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव चव्हाण यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचुन दाखविले.

 

 सन २०२२-२३ वर्षातील लेखापरीक्षण अहवाल वाचुन मंजूर करणे, तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील न्यासाच्या जमा खर्चाची माहिती दिली,  तिर्थक्षेत्र विकास अंतर्गत न्यासाच्या जागेवर नव्याने होणार्या बांधकामांना परवानगी देणे व त्यासाठीच्या कागदपत्रे पुर्तता करणे, सी.एस.आर फंडातून मंजूर करणे, मंदिर परिसरात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून कागदपत्रे पुर्तता करणे,सर्व विकास कामे न्यासामार्फत करणे मा. धर्मादाय आयुक्त नाशिक यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या देवस्थानच्या दानपेटी उघडण्याचा अधिकार ट्रस्टकडे घेण्यासाठी अर्ज दाखल करणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.


 त्याचप्रमाणे मा अध्यक्ष यांच्या परवानगीने आयत्या वेळी येणार्या विषयांमध्ये येथे असलेल्या प्रति पिनाकेश्वर महादेव मंदिर तयार करणे, मंदिरासमोर असलेल्या दिपमाळ परिसरातील ओट्यास संरक्षण भिंत बांधणे, 


भाविकांना देणगी साठी न्यासाचा क्यु आर कोड तयार करून उपलब्ध करून देणे, भाविकांनी देवस्थानच्या ठिकाणी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंची अधिकृत पावती देणे, देणगी पुस्तकांवर न्यासाचे अधिकृत गोल शिक्का मारुन सिल करणे इत्यादी विषयांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली.


याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानदेव चव्हाण, उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, सचिव रामदास चव्हाण, खजिनदार शरद पवार, संचालक शिवाजी वर्पे तसेच सदस्य अर्जुन पाटील, पंढरीनाथ पवार, नाना पवार, अंकुश वर्पे, दशरथ पवार, अरुण हिंगमिरे, रामलिंग हिंगमिरे, हरिओम वर्पे, सुंदरलाल चव्हाण, रामदास उगले, सुदाम पवार, सोपान चव्हाण यांच्यासह सभासद हजर होते.

Post a Comment

0 Comments