नांदगाव तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या डोंगर कुशीत असलेल्या कुसुमतील या गावातील प्राथमिक शाळेत १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुण प्रदर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जातेगाव केंद्र शाळेचे प्रमुख सुभाष चव्हाण सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष विजय चव्हाण पाटील आणि प्रहार संघटना नांदगाव तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, ढेकूचे सरपंच आनंदराव सूर्यवंशी, बाळू यादव माजी सैनिक हे उपस्थित होते,कार्यक्रमाची सुरुवात वरील मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, यासाठी धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक जीवनावर आधारित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घाटमाथ्यावर प्रथमच अशा प्रकारचा सदाबहार कार्यक्रम केल्याचे येथील ग्रामस्थ व येथील सरपंच संदीप पाटील यांच्या तोंडून गौरव उद्या उद्गार करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांनी परिश्रम घेतले, यावेळी ग्रामपंचायत सदस्य काळु भुताबरे आशोक मोरे सदश मंदाकिनी गावडे रेणुका भुताबरे विठाबाई चव्हाण मदाबाई मोरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments