नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील महादेव मंदिराच्या १८ वर्धापन दिनानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, बुधवारी पारायण सोहळ्याच्या काल्याच्या किर्तनाचे औचित्य साधून मा.आ.पंकज भुजबळ यांनी कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी धार्मिक कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले..
कार्यक्रमाची सांगता बुधवार २१ रोजी हभप संतोष महाराज वणवे (बिडकर) यांच्या काल्याच्या किर्तनाने व महाप्रसादाने झाली, महाप्रसादाचा सर्व खर्च येथील शेतकरी बाबासाहेब शिंदे यांनी केला. या सप्ताहाताची सुरुवात बुधवार दि.१४ फेब्रुवारी रोजी झाली होती, या कार्यक्रमाच्या व्यासपीठाचे नेतृत्व हभप.ज्ञानेश्वर माऊली गोंडेगाव यांनी केले.
या निमित्ताने दररोज दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत हभप. एकनाथ म.पवार, भानुदास म. जिरीकर, भोलेगिरी म. निमगाव आश्रम, बापू म.सोनवणे वैभव म. दत्त आश्रम, रामप्रकाशनंद गंगाआश्रम, ज्ञानेश्वर माऊली गोंडेगाव आणि मंगळवार दि. २० रोजी सकाळी ९ ते ११ पर्यंत महामंडलेश्वर १००८ स्वामी परमानंद गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी आकरा ते बारा या वेळेत त्यांच्या अमृतवाणी तुन प्रवचनचा कार्यक्रम झाला.
तसेच हभप.तुकयादास म.काटे, बाळकृष्ण म.बुरकुल, अमरसिंग म.वरखेडकर, प्रल्हाद म.पाचोरा, कल्पेश म.जामनेरकर, कृष्णा म. शहापूरकर, ज्ञानेश्वर वाबळे, आळंदी यांचे दररोज सायंकाळी ९ ते ११ या वेळेत किर्तनाचे कार्यक्रम तसेच हरिपाठाचे व इतर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी येथील महादेव मंदिर आणि गावातील भजनी मंडळ व पिनाकेश्वर भक्त मंडळ यांनी परिश्रम घेतले.
0 Comments