पदाचा गैरवापर करून सदस्याने अडविले घरकुलाचे बांधकाम गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार

 Bay--team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे आकाश एकनाथ गायकवाड यांना शासनामार्फत घरकुल योजने अंतर्गत सन २०२२ मध्ये मंजूर झालेल्या घराच्या बेसमेंटचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येथील ग्रामपालिकेच्या सदस्या सौ. सुनीता भगवान बनकर यांनी काही नागरिकांना हाताशी धरून ग्रामपालिकेकडे एक अर्ज देऊन सुरू असलेले घरकुलाचे बांधकाम बंद पाडले.

याबाबत आकाश गायकवाड यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक कार्यालयाकडे वरील तक्रार खोटी खोटा असुन माझा घरकुलाच्या बांधकामासाठी मंजूर असलेला दुसरा हप्ता वितरित करण्यात यावा अन्यथा आमरण उपोषणाला बसणार असले बाबत अर्ज दिला होता. त्याहुन ३० डिसेंबर २२ रोजी प्रकल्प संचालक डॉ. वर्षा फडोळ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय नाशिक यांनी गटविकास अधिकारी नांदगाव यांना वरील प्रकरणाची शहानिशा करून प्रकरण निकाली काढणे बाबत आदेश दिले.

त्यावरून ग्रामविकास अधिकारी बोलठाण यांनी घरकुल बांधकामास अडथळा करणार्या प्रथम कल्यावती बोरसे, अस्मल सैय्यद, परवीन पठाण आणि यास्मिन सय्यद यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी कार्यालयात बोलावून घरकुलाचे लाभार्थी गायकवाड आणि तक्रारदार यांना दि. २३ मार्च २०२२ रोजी प्रत्यक्ष बोलाविले असता.

वरील चारही तक्रारदारांनी अर्ज मागे घेतला असल्याची शहानिशा करून त्याबाबत मासिक बैठकीत ठराव करुन आकाश गायकवाड यांना शासनामार्फत घरकुल योजनेचा अडविण्यात आलेल्या पुढील हाप्ता देण्यात यावा असे पत्र गटविकास अधिकारी नांदगाव यांना पाठविले होते. तरी सुद्धा त्यांना घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून प्राप्त अनुदानाचा पुढील निधीचा हाप्ता सदस्या सौ सुनीता बनकर यांनी पुन्हा कुरापती करुन घरकुलाचे बांधकाम बंद पाडले आहे. त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आकाश गायकवाड यांनी १६ फेब्रुवारी २४ रोजी गटविकास अधिकारी नांदगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

याबाबत ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव बोलठाण यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी ग्रामपालिका कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची हरकत नसून लाभार्थी गायकवाड आणि सदस्या बनकर यांच्यामध्ये आपसात मतभेद आहेत त्यामुळे बांधकाम बंद पाडले आहे असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments