Team --aavaj marathi
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाच्या समर्थनार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होत. नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील व्यापारी बांधवांनी आप आपल्या आस्थापना शंभर टक्के बंद ठेवून पाठिंबा दर्शविला.
नांदगाव येथे बंद असलेल्या आस्थापना
आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा आंतरवेली सराठी येथे उपोषण सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ नांदगाव येथे तहसील कार्यालयासमोर भास्कर झाल्टे व विशाल वडघुले यांनी देखील उपोषण सुरु केले असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू ठेवून उपोषण सुरू ठेवले आहे.
जातेगाव येथे बंद असलेल्या आस्थापना
तालुक्यातील घाटमाथ्यावरील कृषी उत्पन्न उपबाजार समिती त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा असलेल्या दवाखाने आणि मेडिकल दुकाने दुध डेअरी वगळता सर्व दुकाने मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपापले दुकाने बंद ठेवली होती.
नांदगाव येथे मराठा समाज बांधवांचे सुरू असलेले उपोषण बघण्यासाठी खालील लिंकला टच करा
नांदगाव येथे बंद यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहरातुन मोटरसायकल रॅली काढून बंदचे आवाहन केले होते, त्यास जनतेने उस्फुर्त प्रतिसाद देत आज शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवसाय कडकडीत बंद ठेवण्यात आले. तालुक्यातील लोकसंख्येने क्रमांक तीनचे आणि घाटमाथ्यावरील सर्वात मोठे गाव असलेल्या जातेगाव येथे मराठा समाजाच्या तरुण बांधवांनी सकाळी गावातून फेरी मारुन व्यवसायिकांना बंदचे आवाहन केले होते त्यास सर्वांनी प्रतिसाद देत दिवसभर आपले व्यवसाय बंद ठेवले होते.
आपल्या परिसरातील बातम्या आणि नवनवीन अपडेट बघण्यासाठी आमच्या आवाज मराठी या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन चे बटन दाबण्यास विसरू नका. 🙏
0 Comments