सौ.क.मा.कासलीवाल माध्य.विद्यालय नांदगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आज दि.२७ रोजी निरोप देण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल यांनी भूषविले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार यशाचा मार्ग निश्चित करावा असे आवर्जून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व जीवनात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शालेय जीवनातील हा शेवटचा दिवस असल्याने सर्व विद्यार्थी या प्रसंगी भावूक झालेले दिसून आले.आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शाळेविषयी व शिक्षकांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. अनिष वाघमोडे व जागृती ठोके या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शिक्षक मनोगतात दहावीचे वर्गशिक्षिक गोरख डफाळ यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिद्द, चिकाटी व कष्ट करून यशाचे शिखर गाठावे असे आवाहन केले.
सौ.क.मा.कासलीवाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल सावंत यांनी याप्रसंगी 'कणा 'या कुसुमागराजांच्या कवितेचे वाचन केले, प्रशासकीय अधिकारी गुप्ता सर यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी जीवनात कसे वागावे याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल विश्वस्त जुगलकिशोर अग्रवाल, प्रशासन अधिकारी गुप्ता सर, प्रिन्सिपल मनी चावला, मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, विशाल सावंत, गोरख डफाळ, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पार्थवी वेताळ व विधी साळुंखे यांनी तर विजय गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments