नांदगाव तालुक्यात पश्चिंम व उत्तेरेला बेमोसमी पावसाच्या आगमनाने लोक हैरान झाले या पावसाने कांदा, गहु, हबभरे, द्राक्षे पिकांचे मोठे नुकसान झाले काही ठिकाणी गारपिट झाल्याच्या सांगितले जात आहेत. दि २७ रोजी दुपारच्या सुमारास अचानक ढगांच्या गड-गडाटा सह पावसाचे आगमन झाले त्यामुळे शेतकरी बांधवांची तारांबळ उडाली.
या वादळवार्याच्या व काही प्रमाणात गारांचा पाऊस झाल्याची वार्ता आहे या बेमोसमी पावसाने डोंगळे, आंबामोहर, शेवगा, फळपिकांचे व द्राक्षे पिकांचे नुकासान झाले तसेच साठवून ठेवलेला जनावरांच्या वैरणीचा चारा, कडबा कुट्टी पावसात भिजल्याने जनावरांच्या वैरणीची प्रश्न निर्माण झाला आहे.गत दोन दिवसा पासून लोक असाहाय्य उकाड्याने हैराण झाले होते झालेल्या पावसाने गारवा निर्माण झाला.
तालुक्यात मनमाड शहर आगस्ती डोंगर, हिसवळ, मोहेगाव, बेजगाव,कर्हि, यकुळी, हिसवळ खु!! बु!!, नांदगाव शहर व तालुक्याच्या पश्चिंम, दक्षिण भागाला पावसाने झोडपले यात गहु, हरभरा,या पिकांचे नुकसान झाले तर वादळाने अंबामोहर कैरी गळून पडली. तालुक्यात सर्वच भागाना भिषन पाणी टंचाई निर्माण झाली असून प्रशासना कडून पाणीटंचाईवर पुरेशी उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरीक नाराजी व्यक्त होत आहे. शहरा लगतच्या गिरणानगर, मल्हारवाडी, श्रीरामनगर ,फुलेनगर, हिंगणवाडी, गंगाधरी या गावांना कृञींम पाणी टंचाई निर्माण झाली आहे, ३० दिवस झाले पण नळाला पाणी आले नाही दोन महिण्यापासून नांदगांव शहर आणि लगत असलेल्या सात ग्रांमपंचायतीचा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरीकाना ना इलाजाने खाजगी टँकर धारकांकडून विकत घेण्याची वेळ आली आहे, आज झालेल्या बेमोसमी पावसाचे पाणी साठविण्याची वेळ नागरिकावर आली आहे,नळाला पुरेसे पाणी येत नसल्याने पावासचे पाणी साठवितांना अनेक नागरिकांची धडपड दिसून आली.
0 Comments