वर्धा येथे लिंगायत समाजाच्या सोयरिक महोत्सवास उत्तम प्रतिसाद

 Bay--team aavaj marathi 


वर्धा येथे लिंगायत समाजाच्या वतीने सोयरिक महोत्सवाचे आयोजन दि.२४ ते २५ रोजी नाहातकरप्पा साहेब नागपुर यांच्या अध्यक्षतेखाली व बाबासाहेब भांगे आणि चंद्रशेखर आप्पा उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता, यावेळी अमरावती माजी खासदार अनंतप्पा गुढे आणि माजी महापौर प्रविणप्पा काशिकर हे देखील उपस्थित होते.

दोन दिवस असलेल्या या कार्यक्रमास अकोला, नागपूर आणि वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील आणि परिसरातील समाज बांधव आणि नातेवाईक विवाह योग्य आपल्या मुला मुलींसह मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी विवाह योग्य मुला- मुलींसाठी दोन दिवसांचे चर्चासत्र आयोजित (मेळाव्याचे आयोजन) करण्यात यावे, जेने करून लांबुन आलेल्या समाज बांधवांना पुर्ण वेळ मिळेल असा सुर समाज बांधवां कडून निघाला. समाजामध्ये समाजीक कार्य करणारे समाज बांधव एका व्यासपीठावर यायला पाहीजेत, तेव्हाच मदत समाजाला करू शकू असे मत कार्यक्रमाचे मार्गदर्शक बाबासाहेब भांगे व चंद्रशेखर आप्पा उमरे यांनी व्यक्त केले. यावेळी आयोजन व संकल्पना प्रमुख अजय शेवाळकर हे उपस्थित होते.


समाजाच्या वतीने पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या दोन दिवसीय या कार्यक्रमाचे फल स्वरूप समाज बांधवांना एकत्र चर्चा करण्यासाठी वेळ मिळाल्याने अनेक विवाह ठरले, तर काहींची चर्चा प्रगतीपथावर आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त संबंध जूळावेत यासाठी समाजातील ज्येष्ठ नागरिक व तरुण कार्यकर्ते महिला मंडळाने हिर हिरीने प्रयत्न करत होते.

सर्व मुले व मुलींना योग्य जोडीदार मीळावा या करीता त्याना मी समितीच्या वतीने पुन्हा काही मदत लागल्यास आम्हाला फोन करा फोन काही कारणा उचलला नाही तर राग मानु नका मॅसेज करा आम्ही आपणास सर्व मदत करू स्वखर्चाने येऊ चर्चा घडवुन आणु आपण पण जास्त अपेक्षा न करता समोर जा रंग दोनच आहेत थोडं एकमेकांना समजुन घा रिमॅरेज च्या काही मुली आहेत.


 तर जास्त वय झाले त्या मुलांनी त्या मुली केल्या तरी काहीच हरकत नाही कारण भरपुर मुले आहेत, त्याप्रमाणात मुलिंची संख्या कमी आहे दिवसेंदिवस वय वाढत आहे आपण विचार करूण योग्य निर्णय घ्यावा आम्ही सतत मदत करु आता लवकरच अकोला, नागपुर, यवतमाळ या ठिकाणी आम्ही दोन दिवसांच्या मेळाव्याची तारीख जाहीर करू त्यासाठी सर्व जिल्हातील कार्यकर्ते व महिला टिम यांच्या सोबत चर्चा केली जाईल असे आयोजक समितीच्या वतीने महाराष्ट्र वीरशैव सभा प्रदेश उपाध्यक्ष महेशप्पा शेटे यांनी सांगितले.

मेळावा यशस्वी करण्यासाठी अजयप्पा शेवाळकर व सौ शेवाळकर ताईं, विजयप्पा नादेकर, प्रविण चाकोते, निलेशप्पा शेटे, डॉ.जयेशप्पा हातगावकर, डॉ.हातेकर साहेब, प्रतिक गाढवे, जुनणकरप्पा, सतोशप्पा अबुलकर, कल्याणकरप्पा, मनोहरप्पा कापशे, अशोकप्पा जिवरकर,कावळे साहेब, सुनिलप्पा माटे, प्रकाशप्पा नादेकर, गणेशप्पा कासवे, गिलोरकरप्पा, गडेकरप्पा, ईसासरेप्पा, कोठावळेप्पा, अनिलप्पा मोकाशी, मुगशेप्पा, हवाप्पा, नारायणपुरेप्पा, कोल्हेप्पा, सौ शेवाळकर ताई, सौ ढोले ताई सौ जगदंबे ताई, सौ गडेकर ताई, सौ आवते ताई, सौ कोठवले ताई, सौ हातेकर ताई, सौ ईसासरे ताई, सौ मानेकर ताई, सौ वडगावकर ताई यांच्यासह सर्व समाज बांधवांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उर्मिला ताई कासवे, सौ सुषमा यमतकर, सौ.अक्कलवार, सौ मानेकर ताई यांनी केले 


    


 


 

Post a Comment

0 Comments