नांदगाव तालुक्यातील मौजे लोढरे येथील आर व्ही के हायस्कूल मध्ये २८ फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन विज्ञान विभाग प्रमुख हिरे वाय डी यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. दत्तात्रय पा. निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कमोदकर साहेब, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष राजेंद्र कारभारी निकम, प्रवीण निकम, सचिन निकम, दिलीप सोनवणे, अर्जुन निकम, अजय बागुल, अक्षटय निकम तसेच विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
शालेय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रकल्प स्वतः बनवले व त्यांची व्यवस्थित मांडणी केली. तसेच वैज्ञानिक भित्तीपत्रके व रांगोळीच्या माध्यमातून वैज्ञानिक प्रकल्प सादर केले.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच विज्ञानाची आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या हेतूने शाळेत आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे असे असे मत पालकांनी व्यक्त केले एकूणच सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकवृंदांना पालकांनी कौतुकाची थाप दिली.
0 Comments