नांदगाव तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, सदर परिस्थितीची माहिती मिळताच विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे आ. सुहास आण्णा कांदे मुंबई येथे असलेल्याने त्यांनी तहसीलदार सुनील सौंदाणे आणि तालुका कृषी अधिकारी गाडे यांच्याशी संपर्क साधून यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहसंबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना अवकाळी पावसामुळे शेतमालाचे झालेल्या नुकसानीची माहिती देऊन शेतकरी बांधवांना मदत देण्याची मागणी त्यांनी केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,शहर परिसरासह ग्रामीण भागात नांदगाव तालुक्यात सलग तीन दिवस अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये रब्बी पिकातील मका, डाळिंब, शेवगा इत्यादी पिकांचे मोठे नुकसान झाले, याबाबत माहिती मिळताच घेऊन आ. सुहास आण्णा कांदे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असता आज आमोदे या गावी तहसीलदार सुनील सौंदाणे कृषी अधिकारी गाडे आ. कांदे यांचे प्रतिनिधी युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, प्रकाश शिंदे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
आमोदे येथील शेतकरी विठ्ठल पुंडलिक पगार, संजय पगार, बाबाजी पगार, गणेश पगार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मका, डाळिंब, शेवगा इत्यादी पिकांची प्रतिनिधिक स्वरूपात पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे दिसून आले. प्रत्यक्ष परिस्थिती बाबत अण्णासाहेबांना कळविले असता त्यांनी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी आमोदे येथील सरपंच सौ. वैशाली पगार, सदस्य विठ्ठल पगार, उपसरपंच भूषण पगार, कृष्णा पगार, रामकृष्ण पगार, समाधान पगार, वाल्मीक पगार, तलाठी तुषार येवले, कृषी सहाय्यक राहुल जैन अदि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments