जातेगाव येथे बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

 Bay--team aavaj marathi 

K.k. mahale 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे बुध्द पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे औचित्य साधून गौतम शिंदे समाधान लाठे राहुल लाठे अर्जुन सोळस यांच्या तर्फे उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांना खीर देऊन भोजनाचा कार्यक्रम दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून बौद्ध वंदना घेवून अभिवादन करण्यात आले, यानंतर खिरीचा नैवेद्य अर्पण करून उपस्थित उपासकांना खिर दान करण्यात आली.

या कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध यांनी पौर्णिमेच्या दिवशी आपली तपश्चर्या पुर्ण केल्यानंतर आपला उपवास तांदळापासून तयार केलेल्या खिर प्रशान करुन केला होता, तेव्हा पासून या कार्यक्रमास विशेष महत्त्व आहे. भगवान गौतम बुद्ध यांना दर महिन्याला तांदळाच्या खारीचा नैवेद्य अर्पण करतात असे ग्रामपालिका सदस्य बाळासाहेब लाठे यांनी याप्रसंगी सांगितले.

या कार्यक्रमास ग्रामपालिका सदस्य संदीप पवार,राजू शेख तसेच बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या प्रमाणात हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कचरू लाटे सर यांनी केले. वरील कार्यक्रमाचे अन्नदाते यांचे स्वागत शंकर दादा लाठे यांनी शाल व श्रीफळ देऊन केले.

Post a Comment

0 Comments