नांदगाव शहरालगत असलेल्या गिरणानगर येथील माणिक मोरे या आदिवासी तरुणाच्या झापाला आग लागून संसारपयोगी वस्तूसह धान्य, सर्व भांडी, कपडे कागदपत्रे आदी महत्वाच्या गोष्टी जळून खाक झाल्याने त्याचा संसार मोडून पडला होता. याबाबत गिरणानगर च्या सरपंच सौ.अनिता पवार यांनी आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौ.अंजुमताई कांदे यांना कळवली असता त्यांनी लगोलग मोरे कुटूंबाला त्यांच्या (देवाज) निवास्थानी बोलावून घेतले व तातडीने धान्य, संसार उपयोगी भांडे, कपडे, इत्यादी वस्तू दिल्या.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गिरणानगर येथील माणिक मोरे या तरुणाच्या जापास आग लागून संसार उपयोगी वस्तूंचे कागदपत्रे धांडे कपडे तसेच धान्य वगैरे जळून खाक झाले होते या घटनेची माहिती सौ अंजुमताई कांदे यांना मिळताच मोरे परिवाराची आस्थेवाईक पणे चौकशी करून त्यांना धिर दिला तसेच संसार उपयोगी वस्तू कपडे धान्य कडधान्य दिले, व काळजी करु नका आम्ही तुमच्या सोबत असल्याचा शब्द दिला असता मोरे कुटूंबाने आ.सुहास अण्णा कांदे व सौ. कांदे यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली, यावेळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख उज्वला ताई खाडे, युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे, शशी सोनावणे, सुनील जाधव, राहुल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments