आ. सुहास कांदे व सौ अंजुम ताई कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विविध महादेव मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या महिला भगिनींना रुद्राक्ष भेट देण्यात आले.
आठ मार्च महाशिवरात्र व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मतदार संघातील विविध महादेव मंदिरात येणाऱ्या भक्त भाविक महिला माता-भगिनींना रुद्राक्ष वाटप करण्यात आले.हे रुद्राक्ष श्री महंकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन येथून महा रुद्राभिषेक करून आणलेले आहेत.
महिला वर्गात भगवान शिवाची पूजा करणे आणि सोबतच रुद्राक्षाची मोठी आस्था आहे, सुख शांती वैभव व उन्नती मिळावी या उद्देशाने रुद्राक्ष भेट देण्यात आले. नांदगांव येथील श्री नांदेश्वर महादेव मंदिर येथे सायंकाळी सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते आरती करुन या ठिकाणी रुद्राक्ष वाटप करण्यात आले.
सोबतच नांदगाव शहरातील महादेव मंदिर चांडक प्लॉट नागेश्वर मंदिर नागेश्वर चौक येवला रोड महादेव मंदिर एसटी कॉलनी, 11 मुखी महादेव मंदिर गंगाधरी, तळ्यातला महादेव मंदिर, येथे रुद्राक्षांची वाटप करण्यात आली.
सोबतच बोलठाण येथील महादेव मंदिर, जातेगांव येथील डोंगरावरील पिनाकेश्वर महादेव मंदिर, कासारी, आमोदे, बोराळे बेलेश्वर जळगाव बुद्रुक तसेच मतदार संघातील विविध गावांमध्ये, महादेव मंदिरात रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना युवासेना महिला आघाडी कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकारी व शिवभक्त भाविक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments