नांदगाव ( प्रतिनिधी) दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने व कृतिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने वुमन रायझिंग स्टार अवाॅर्ड २०२४ राष्ट्रीय पुरस्काराने नांदगाव येथील सौ.अलका नारायणे यांना रविवार दि.१० मार्च रोजी नाशिक येथील पलाश सभागृह गुरुदक्षिणा हाॅल, काॅलेज रोड येथे दुपारी सन्मानित करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सौ.अलका नारायणे यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्तरावरील वुमेन रायझिंग स्टार अवाॅर्ड २०१४ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने नाशिक येथील कर्तव्यदक्ष पोलिस उपायुक्त कविता राऊत, नाळ चित्रपटाच्या लोकप्रिय नायिका अभिनेत्री देविका दप्तरदार, विशेष इंडिया इंटरनॅशनल २०२४ विजेत्या ज्योती शिंदे, ग्राहक संरक्षण समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आशा पाटील, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण समितीच्या सदस्या सायली पालखेडकर, लोक भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशीताई अहिरे, पर्यावरण रक्षण कार्य करणारे मंत्राने ग्रिन रिसोर्सचे अध्यक्ष डॉ. यु.के.शर्मा, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये सौ.ऋतुजा हर्षद नारायणे यांना मनाली, केरळा, काश्मीर, बॅंकाॅक साठी तीन दिवसांचे काॅम्पलेमेंटरी हाॅलीडे गिफ्ट व्हाउचर सन्मान पुर्वक देण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
0 Comments