नांदगाव तालुक्याचे जलदुत आ. सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा येथील दगडवाडी व तीन वाड्या वस्त्यांसाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे ५२ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून या कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे व किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,आ. सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या दगडवाडी व तीन वाड्या या वस्तीसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ५२ लाख रुपये किंमतीची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून, आज त्या कामाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे व किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.
आ.श्री.कांदे यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटया -छोट्या वाड्या - वस्त्यांवरील ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याचे होणारे हाल बघून या सर्व वस्त्यांसाठी जलजीवन योजनेअंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणल्या आहेत. या योजनांमुळे सदर वस्तीवरच्या ग्रामस्थांचे पाण्यासाठी होणारी फरफट कायमची थांबणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी बोलताना मजूर संस्थेचे संचालक प्रमोद भाबड म्हणाले की तालुक्यात आतापर्यंत एकाही विधानसभा सदस्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना राबविलेल्या नसून आमदार सुहास अण्णा यांनी मनमाड नांदगाव सह ग्रामीण भागातील ग्रामस्थांसाठी जल जीवन मिशन अंतर्गत स्वच्छ पाणीपुरवठा योजना राबविल्या असून आमदार सुहास अण्णा हे तालुक्यासाठी जलदूतच लागले आहे असे गौरव उद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
0 Comments