छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व नांदगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगर अध्यक्ष राजेश (बबी काका) कवडे यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श शिशु विहार जातेगाव व जिल्हा परिषद शाळा बोलठाण येथे मंगळवार दि. २ रोजी श्री छत्रपती जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना चित्रकला वही, रंगवेटी, कंपासपेटी, पाण्याची बॉटल असे शालय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
जातेगाव येथील कार्यक्रमाचे नियोजन जनसेवा मंडळाचे अध्यक्ष धनराज पवार,गोरख गायकवाड,अनिल चव्हाण, रामेश्वर सोनवणे, युवराज काळे, पप्पू तुपे आकाश जोनवाल, सुभाष जुधरे, ललित पगारे, मयूर सूर्यवंशी व मित्र परिवाराने केले तर बोलठाण येथील कार्यक्रमाचे नियोजन जनसेवा मित्र मंडळ बोलठाण शाखेच्या व गणपती चौक मित्र मंडळ तसेच ओम बाविस्कर मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार जिल्हा परिषद शाळा बोलठाण येथील मुख्याध्यापक अशोक सूर्यवंशी व जातेगाव येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जातेगाव मुख्याध्यापक डी वाय चव्हाण तसेच आदर्श शिशुविहार शिक्षिका सीमा पवार यांनी आभार मानले
0 Comments