भगव्या ध्वजाची मिरवणूक काढून मराठी नवीन वर्षाचे स्वागत

 Bay team aavaj marathi 

 नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे मराठी नवीन वर्षाचे बुधवार दि.११ रोजी सालाबाद प्रमाणे ५१ फूट उंच असलेला भगवा ध्वजाची गावातील प्रमुख पालखी मार्गाने येथील ग्रामदैवत भगवान पिनाकेश्वर महादेवाच्या गावातील मंदिरापासून सकाळी १० वाजता ढोल-ताशांच्या आणि सनई या वाद्यांच्या गजरात गावात मिरवणूक काढण्यात आली होती,या ध्वजास राम काठी या नावाने ओळखले जाते.

 हा ध्वज दि.३० मार्च फाल्गुन कृ. पंचमीस गावातील महादेव मंदिरासमोर भगवा ध्वज उभारला होता. यासाठी वापरल्या जाणाऱ्या काठीस रामकाठी असे संबाधले जाते. या ध्वजाची सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी (दि.१०) सकाळी ढोल-ताशांच्या आणि सनई या वाद्यांच्या गजरात गावात मिरवणूक काढण्यात येते. येथील प्रथे प्रमाणे या रामकाठीच्या मिरवणुकीत प्रत्येक चौकामध्ये महिलांकडून ध्वजाचे आणि या काठीच्या खालील बाजूस असलेल्या पितळाचा नंदी पूजन व औक्षण करण्यात आले. येथील व पंचक्रोशीतील नागरिक घरातील लहान मुलांना नंदीसोबत आंघोळ घालतात. 

येथील ग्रामदेवता श्री पिनाकेश्वर महादेवाचा वार्षीक यात्रा उत्सव चैत्र शुद्ध नवमीस (दि.२ मे) साजरा होणार आहे. या यात्रेच्या वातावरण निर्मितीची सुरुवात या ध्वजाच्या स्थापनेपासून (उभारल्या पासून) होते, दरवर्षी यात्रेच्या एक महिना अगोदर ध्वज उभारला जातो. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष मेहतर, नाना काटे, सोपान खिरडकर, उत्तम गायकवाड, नंदु पवार, नाना पवार, गुलाब पाटील, भरत पाटील, एकनाथ चव्हाण, रावसाहेब काटे, रखमा वर्पे, आप्पा शिंदे, अनिल शिंदे आणि नागरिकांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments