आ.श्री.सुहास अण्णा कांदे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत संकट निवारण, व उन्नतीसाठी प्रार्थना करून, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद व प्रेम कायम असू द्या, यापेक्षा अधिक विकासकामे केली जातील असे सांगितले.ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे, त्या त्या ठिकाणी विकासकामे केली आहेत, व करत आहे. असे सांगून उपस्थित समुदायाला ईद उल फित्र च्या शुभेच्छा दिल्यात. प्रथमच मुस्लिम बांधवांच्या ईद उल फित्र निमित्त तालुक्याचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहिल्याने मुस्लिम बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी जामा मस्जिद ट्रस्ट च्या वतीने आमदार सुहास कांदे यांना भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना तालुक्यातील माझ्या मुस्लिम बांधवांसाठी आजपर्यंत नवीन लाल इदगाह साठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ते काम पूर्ण झाले आहे. शादीखाना साठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे, तर नवीन लाल ईदगाह सुशोभीकरण साठी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, असे जवळपास ३ कोटी ८५ लाख रुपये मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक क्षेत्रासाठी दिले आहेत.असे स्पष्ट करून,समाजातील गोरगरीब मुली - मुलांच्या लग्नासाठी दरवर्षी आर्थिक मदत करणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केले.
या कार्यक्रमाचे नियोजन आमदार सुहास अण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या कार्यकारी मंडळाचे अय्याज शेख, रियाज पठाण, हाजी सय्यद, इम्रान पठाण, हारून मनियार, फईम शेख, इम्रान आदींनी केले होते. वरील कार्यक्रममास आ.कांदे यांच्या सोबत शिवसेना नेते प्रमोद भाबड, समाधान पाटील, अमोल नावंदर, सागर हिरे, किरण देवरे, सुनील जाधव, प्रकाश शिंदे,अय्याज शेख, शशी सोनावणे, यांच्यासह जामा मस्जिद ट्रस्टचे हाजी मुन्नवर साजिद तांबोळी, हाजी जहीर, रियाज पठाण, आदिंसह हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
0 Comments