नांदगांव येथील मनमाड रोडवरील श्रीरांमनगर हद्दीतील हाॅटेल राजगार्डन च्या मागील बाजूस रामेश्वर काॅलीणी लगत असलेल्या शेतावरील घरासमोरील श्रीकांत विश्वनाथ खैरनार यांचे मालकीची MH 41/7810 फॅशन प्रो , व MH 15/FL 5582 काळ्यारंगाची फॅशन प्रो या दोन मोटारसायकली घराच्या समोर लावलेल्या असताना दि. १० मार्च रोजी राञौ १ ते पहाटे ५ वाजे च्या दरम्यान अज्ञात चोरांनी हेंन्डल लाॅक तोडून चोरून नेल्या या घटनेने परीसारात एकच खळबळ उडाली असून घटनेची नांदगांव पोलिसात खबर देण्यात आली असून नांदगांव पोलिस तपास घेत आहेत.
पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांचे आवाहन
नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज वाघमारे यांनी आपल्या दुचाकी, इतर किमती वस्तू, शेतात असेल तर पाळीव जनावरे आपल्या घराच्या समोर सहजपणे नजरेस पडतील अशा ठिकाणी शक्यतो बंदिस्त ठेवावी. शक्य झाल्यास सीसीटीव्ही यंत्रणा बसवून घ्यावी, त्याचप्रमाणे एखाद्या अनोळखी इसम संशयित रित्या आपल्या परिसरात फिरताना आढळून आल्यास तातडीने चौकशी करावी त्यात पोलिसांच्या ताब्यात द्यावे. किंवा पोलिस ठाण्यात त्याबाबत माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले असून त्यामुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी मदत होणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
0 Comments