किसान माध्यमिक विद्यालय वाखारीची निकालाची परंपरा कायम

 Bay team aavaj marathi 



नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक संचलित किसान माध्यमिक विद्यालय नांदगाव तालुक्यातील वाखारीच्या इयत्ता १०च्या विद्यार्थ्यांनी उज्वल निकालाची परंपरा यावर्षी देखील कायम राखली.

कु.दिव्या काकळीज ९४.८०%


SSC परीक्षा मार्च 2024 विद्यालयाचा शेकडा निकाल 98.11 ℅ निकाल लागला असून विद्यालयात परिक्षेसाठी प्रविष्ट 53 विद्यार्थी होते . त्यापैकी विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी 44 तर  7 विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवीले व द्वितीय श्रेणी एका  विद्यार्थी मिळवीला ATKT  01 विद्यालयात प्रथम - कु. दिव्या भारत काकळीज 94.80%, द्वितीय - कु. शुभांगी बाबाजी कुटे 93.60%, तृतीय - कृष्णा दादाजी चव्हाण 93.20% गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मुख्याध्यापक श्री ध.रा. सोनवणे सर, शालेय समिती अध्यक्ष श्री विजय चोपडा सर,  संस्थेचे पदाधिकारी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

शुभांगी कुटे ९३.६०%

कृष्णा चव्हाण ९३.२०%




Post a Comment

0 Comments