जनता विद्यालय जातेगावचा 94.73%निकाल

 Bay team aavaj marathi 

भरत पाटील पत्रकार जातेगाव नांदगाव 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र  परीक्षा  सन. 2024 चा निकाल 94.73% लागला असून विद्यालयातील एकूण 95 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.  त्यापैकी 48 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले, 28 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व द्वितीय श्रेणीत 13 उत्तीर्ण झाले आहे .तर विद्यार्थी तसेच 1 विद्यार्थी तृतीय श्रेणीत  उत्तीर्ण झाला आहे. विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी खालील प्रमाणे कु. व्यवहारे संचिता धनराज( 469) 93.80%,  कुमार. पवार ओम नवनाथ( 464) 92.80%, कु. व्यवहारे स्नेहा रमेश ( 462) 92.40* %, कु. पगारे अमृता बबन (462) 92.40%,  कु.पवार समृद्धी राहुल( 457) 91.40 %, कु. शिंदे साक्षी संतोष (453) 90.60% गुण मिळवून विद्यालय प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस मा.अँड.नितीनजी ठाकरे, नांदगाव तालुका संचालक मा.श्री. अमित भाऊ बोरसे, स्कुल कमिटी अध्यक्ष मा. गोटू भाऊ गोपीनाथ निकम, उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष मा. जयवंतराव यादवराव चव्हाण, शिक्षणाधिकारी मा. डॉ.श्री. भास्करराव ढोके व सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. डी. वाय. चव्हाण सर व सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुण पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments