कासारी घाटात अवघड वळणावर अननस घेऊन जाणारा ट्रक पलटी रहदारी ठप्प

 Bay team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील कासारी जवळील चांदेश्वरी घाटात अवघड वळणावर अननस घेऊन जाणारा ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सोमवारी दि.२७ रोजी सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान  मनमाड येथून इंधन घेऊन बोलठाणच्या दिशेने घाट चढून वर येणाऱ्या टॅंकरच्या इंधन टाकीला धडक देवून रस्त्यावर पलटी झाल्याने दोन्ही बाजूला दोन दोन किलो मिटर रहदारी ठप्प झाली होती. 

गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावर असलेला घाट रहदारीसाठी अवजड वाहनांना बंद केल्याने सर्व वाहतूक वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला- लोणी - तलवाडा ते नांदगाव तालुक्यातील कासारी या मार्गाने सुरू करण्यात आली होती.

मात्र तलवाडा गावाजवळील घाटात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने त्याच प्रमाणे घाटातील तीन किलोमीटर अंतर हे वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने तेथे रस्त्याची डागडुजी किंवा नवीन रस्ता तयार करण्यासाठी वन विभाग परवानगी देत नसल्याने वरील दोन्ही रस्त्याची वाहतूक कासारी येथून चांदेश्वरी घाटातून जातेगाव, बोलठाण या मार्गाने वळविण्यात आली आहे.


परंतु नवीन वाहन चालकांना या घाटातील अवघड वळण किंवा जास्तीचा असलेला उतार लक्षात येत नसल्याने या रस्त्यावर आणि चांदेश्वरी घाटात वारंवार अपघात घडत आहेत. तरी यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.

वरील अपघातात सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून अपघात ग्रस्त दोन्ही वाहनांचे इंधन आणि इंजिन मधील ऑईल रस्त्यावर सांडल्याने सर्व रस्ता तेलकट झाल्याने आणखी इतर वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे, अपघात ग्रस्त दोन्ही वाहने रस्त्यावर असल्याने फक्त दुचाकी वाहन जाईल इतकीच जागा आहे.


Post a Comment

0 Comments