नांदगांव जातेगांव येथे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार दगाव तालुक्यातील जातेगाव येथे दि.3 रोजी ग्रामपालिकेच्या वतीने इयत्ता मुले दहावी व बारावी मध्ये प्रथम एक ते पाच क्रमांकाने क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा वतीने करण्यात आला होता.
यामध्ये एसएससी मध्ये कु. वैष्णवी पवार हिने तालुका रँक मध्ये 96.20% मार्क घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. कु. संचिता व्यवहारे 93.80%, कुमार ओम पवार 92.80%, कु. स्नेहा व्यवहारे ९२.४० टक्के,.कु. अमृता पगारे 92.5%, कु.समृद्धी राहुल पवार 91.5% ,कु. साक्षी शिंदे, ९०.६०,कुमार सतीश चव्हाण 91%, कु.पायल भिडे 88.60%, कु गरिमा चव्हाण 87.80% , सुशांत राठोड 87.40%, कु. सौरभ राठोड 86.40%, त्याचप्रमाणे इयत्ता बारावीतील कु. रोशनी काकरवाल 81.67%, कु. आरती काटे 76.33%,.कु सुजाता वाघ ७४.६७ %, श्रद्धा पगारे 82.83%, कु. श्रेया पवार 81% गुण मिळवून जातेगांव, बोलठाण आणि वसंत नगर येथील विद्यालयातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या उत्कृष्ट प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपालिकेच्या वतीने शाल आणि बॉल पेन देऊन करण्यात आला. यावेळी कु. वैष्णवी पवार आणि रोशनी काकरवाल या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच मिशन 500 कोटी जलसाठा अंतर्गत नऊ मुली पुणे येथील आजम कॅम्पस येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आल्या होत्या त्यामध्ये साक्षी घरमोडे,सायली घरमोडे, वेदिका सोनवणे ह्या मुलींचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी जि. प. शाळेचे माजी मुख्याध्यापक अनिल बंड यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे श्री विजय पाटील व तात्याराव आहेर यांनी मुलांना मार्गदर्शन केले यावेळी सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य मंडळ व गावातील प्रतिष्ठित, सुजाण नागरिक हे उपस्थित होते .त्या कार्यक्रमासाठी ग्रामपालिका सदस्य बाळासाहेब लाठे व संदीप पवार राजू शेख यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपस्थितांचे ग्रामविकास अधिकारी गोपाल चौधरी यांनी आभार मानले.
0 Comments