नांदगांव येथील अंनिस च्या कार्यकर्त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील फोतीबाई आणि अनेक महिलांना डाकीण भूताळीण ठरविणाऱ्या रुम्या हन्या पराडके ह्या भोंदू बाबाचे स्टिंग ऑपरेशन दि ४ रोजी केले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, डाकीण- भूताळीण विरोधी संवाद यात्रेत सहभागी असलेल्या महाराष्ट्र अंनिसच्या नांदगाव येथील कार्यकर्त्यांनी धडगाव,जिल्हा नंदूरबार) रुम्या हन्या पराडके ह्या भोंदू बाबाचे स्टिंग ऑपरेशन दि ४ रोजी करुण त्यास पुराव्यानिशी येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज सादर केल्यानंतर त्यास पोलिसांनी काल रात्रीच वरील भोंदू बाबास त्याच्या सहकार्यांसह अटक केली असून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत वरील भोंदू बाबा व त्याच्या सहकार्यावर कारवाई केली.
महाराष्ट्र अंनिसचे मोठे यश असून अंधश्रद्धा पसरवणे, किंवा एखाद्या व्यक्तीची अंधश्रद्धेतुन फसवणूक करणे तसेच त्याची शारीरिक मानसिक छळवणूक करुन आर्थिक लुबाडणूक करणे हा कायदेशीर गुन्हा असून असे प्रकार आपल्या परिसरात घडत असल्यास त्याबाबत माहिती द्यावी. निश्चितच त्यांची मदत केली जाईल असे नांदगाव येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने यावेळी देण्यात आले. त्यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
0 Comments