वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ मारहान व महिला कर्मचार्याला लज्जा उत्तपन्न होईल, असे वर्तन केले म्हणून गुन्हा दाखल हि घटना न्यायडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली याची नांदगांव पोलिसात नोंद करण्यातआली असून पोलीस संशयीतांचा शोध घेत आहे.
वरील घटने बाबत नांदगांव पोलीस ठाण्यात डाॅ. प्रशांत धोंडीबा तांबोळी रा.न्याडोंगरी ता. नांदगांव यांनी संशयीत आरोपी सोमनाथ पवार,पप्पु पवार,रा,पिंप्रीहावेली ता. नांदगांव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून फिर्यादीत म्हटले की, वरील संशयित आरोपी यांनी दि. ६ जुन रोजी न्यायडोंगरी येथील प्रा.आरोग्य केंद्रात मद्यपान करुन रुग्नाला भेटायला आले व रुग्णांना पिण्यास पाणी नाही. या कारणावरून हुज्जत घातली व फिर्यादीला व महिला कर्मचार्याला शिवीगाळ करुन मारहान करुन महिलेशी असभ्य वर्तण केले म्हणून, गु र नं २३४/ २०२० वरुन, ३५३, ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४ मेडिकल अँक्ट २०१०, क.३,४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदगांव पोलीस घटनेचा घटनेचा अधिक तपास करत आहेत.
0 Comments