नांदगांव शहरात दि ५ जुन रोजी सायंकाळी साहा वाजेच्या सुमारास पाण्याचा टँकर जोडलेल्या ट्रक्टरचा थरार नांदगांव करांनी अनुभवला या थरारात मोकळ नामाक. एक महिला जखमी झाली असून याच वाहनाने एका दुचाकीला चेंगरुन टाकले तसेच आनेक जन आपला जीव वाचविण्यासाठी धवपळ करीत होते हि घटना नांदगांव मालेगांव रोडवर हाॅटेल गायञी ते जैनधर्मशाळा या दरम्यान घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भरधव वेगाने चालविलेला ट्रॅक्टर ला जोडलेला पाण्याचा टँकर पलटी झाला .ट्रॅक्टर नांदगांव शहरातील असल्याचे समजले चालकाने मद्यधुंद आवस्थेत वाहन चालउन अपघात केला असे पोलीस सुञाकडुन सांगण्यात आले. दरम्यान सा पो नि संदीप बडे यांनी घटनास्थळी धाव घेत रोडवर पलीटी झालेला टँकर क्रेनच्या मदतीने उभाकरुन रहदारी मोकळी केली. एम एच ४१/ बी ई १९३५ या टॅक्टरला निळ्या रंगाचा पाण्याचा टँकर जोडला होता. हा वाहन चालक मद्यधुंद आवस्थेत शहरातील नांदगांव मालेगांव रोडवर भरधाव वाहन चालून एक महिलेला ठोस मारून एक दुचाकीला चेंगरुन पलटी झाला.
या दरम्यान ट्रॅक्टर चालकाने मद्यधुंद आवस्थेत नांदगांव कडुन मनमाड, मालेगांव रोडवर वाहन भरधाव चालून अपघात घडविला या त एक अॅक्टीव्हा दुचाकी चेंगरली सदर वाहन चालकाला पकडण्यात पोलीसाना यश आले. सध्या नांदगांव शहरात भिषन पाणी टंचाई असल्याने टँकरच्या व इतर वाहनाच्या मदतीने विकत पाणी पुरवठा केला जातो असाच हा टँकर नंबर नसलेला किंवा पासींग नसलेला? बिनधास्तपणे रोडवर वावरताना हा अपघात झाला आहे. असी आनेक वाहने नंबर नसलेली शहरात बिनधास्त वावरत असतात याची दखल वाहतूक पोलिसानी घ्यावी व संभाव्य अपघात टाळावे अशी मागणी होत आहे .
0 Comments