दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकरी शेतीपुरक म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळत असतांनाच नांदगाव लगत असलेल्या गंगाधरी येथील रहिवासी शेतकरी योगेश गंगाधर सोमासे यांची दि. ७ रोजी खळ्यात बांधलेली काळ्या रंगाची पुढे शिंगे असलेली ७० ह. रु किंमतीची गाय भामट्यांनी मध्यराञी मालक झोपेत असताना चोरीला गेली.
या घटनेमुळे सोमासे कुटुंबावर आर्थीक संकट निर्माण झाले आहे.या संदर्भात पिकअप टेम्पोचा पाठलाग केला असता तो भरधाव वेगाने मालेगांव दिशेने पसार झाला. सोमासे परीवाराने घर प्रपंचाचा उदरनिर्वाहासाठी नुकतीच सत्तर हजार रुपयांची उदार उसनवार करुन गाय घेतली होती. ती गाय दररोज एकावेळी १२ लिटर दुध देत होती. जेमतेम परिस्थिती असतांना गाय चोरीला गेल्याने सोमासे कुटंबावर संकट निर्माण झाले आहे. या संदर्भात नांदगांव पोलिसात खबर देण्यात आली असून, याच दिवशी रात्री वडाळी बाणगांव येथून बैल व गाय चोरीला गेल्याच्या वार्ता आहे. दरम्यान घाटमाथ्यावरुन देखील मोठ्या प्रमाणात दुभते पशुधन त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्या बैल गोह्रे मागील काही दिवसांपासून चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी बांधवांनी शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून निवडलेल्या दुधाच्या व्यवसायाला दृष्ट लागल्याचे दिसून येत असून पोलीस खात्याने लक्ष घालून वेळीच आवर घालावा अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी कडून करण्यात येत आहे.
0 Comments