Bay team aavaj marathi
भरत पाटील पत्रकार जातेगाव (नांदगाव)
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे बस स्थानकाजवळ रस्त्याच्या कडेला असलेले मोठे बाभळीचे झाड शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान वादळामुळे रस्त्यावर पडल्यामुळे छत्रपती संभाजी नगर कडे येणारी-जाणारी वाहतूक त्याचप्रमाणे शनिवारी बोलठाण येथील आठवडे बाजार असल्याने भाजीपाला व इतर व्यावसायिकांचे वाहने थांबल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
त्यामुळे वाहनांच्या लांबत लांब रांगा लागल्या होत्या, तसेच या झाडामुळे विजेचा एक खांब पडला व एक लोखंडी खांब वाकल्यामुळे जातेगांव येथील गावठाणचा विज पुरवठा जवळपास विस तास खंडित झाला होता. शनिवारी सकाळी आठ वाजता झाड कापून जेसीबी मशीनच्या सहाय्याने बाजूला केल्यानंतर रहदारी सुरळीत झाली. तर सायंकाळी सहा वाजता नवीन विजेचे खांब बसविल्यानंतर विज पुरवठा सुरळीत चालू झाला.
0 Comments